चोखामेळा संत भला ।
तेणें देव भुलवीला ॥१॥
भक्‍ति आहे ज्याची मोठी ।
त्याला पावतो संकटीं ॥२॥
चोख्यामेळ्याची करणी ।
तेणें देव केला ऋणी ॥३॥
लागा विठ्‌ठल चरणीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥