संतु म्हणे मी जेँ सांगितलेँ तुम्हा ।
आपलेँ कृपेनेँ फळ दिलेँ आम्हा ।।
नाहीँ तरी आम्हां कैचे ज्ञान कांही ।
मुळीँच तेँ नाहीँ पाठांतर ।।
संतु म्हणे कांहीँ सांगितलेँ नाही ।
पांडुरंग पायीँ धरियलेँ ।।