आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी ।
सांवतामाळी यांनी आणि विदुरानीँ ।।
तसेच हे तेल घेते जनाबाई ।
मागेँ पुढेँ पाही कान्हुपात्रा ।।
संतु तेली म्हणे तेल आवघेँ झालेँ ।
पुष्कळ तेँ नेलेँ तुकोबानेँ ।।