मन मोहाची करुनि खुटी ।
लाठीस ठोकली बळकटी ।।१।।
फिरे गरगरा लाठी भोवताली ।
ध्यान जाईना लाठीवरी ।।२।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी ।
पहा उठाउठी अगोदर ।।३।।