वेदांतीं हें बोलिले ।
सिद्धांतीं हें नेमियेले ॥१॥
लागा लागा भक्तिवाटा ।
धरा हेंचि नेमनिष्‍ठा ॥२॥
वेदबाह्य तें कर्म ।
सांडीं न करीं अधर्म ॥३॥
तोचि एक होय ज्ञानी ।
देवनिष्‍ठ म्हणे जनी ॥४॥