जनींचें बोलणें वाची नित्य कोणी ।
तयाचे आंगणीं तिष्‍ठतसे ॥१॥
जनीचिया पदां आखंडित गाये ।
तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥
जनीचे आवडे जयासी वचन ।
तयासी नारायण कृपा करी ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा ।
ऐसा वर द्यावा जनीसाठीं ॥४॥