तुझी नाहीं केली सेवा ।
दुःख वाटतसे जीवा ॥१॥
नष्‍ट पापीण मी हीन ।
नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दुःख झालें मला ।
तें तूं सोशिलें विठ्‌ठला ॥३॥
क्षमा करीं देवराया ।
दासी जनी लागे पायां ॥४॥