तुझ्या निजरुपाकारणें ।
वेडावलीं षड्‌दर्शनें ॥१॥
परि सोय न कळे त्यांसी ।
समीप असतां देवासीं ॥२॥
चारीश्रमें हो कष्‍टती ।
वेदशास्त्रें धुंडाळिती ॥३॥
परि कवणें रीति तुला ।
न जाणवे जी विठ्‌ठला ॥४॥
तुझी कृपा होय जरी ।
दासी जनी ध्रुपद करी ॥५॥