नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा ।
मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनीसंगें लोहो होय सोनें ।
तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥
जनी ह्मणे जोड झाली विठोबाची ।
दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥