आह्मी पातकांच्या राशी ।
आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥
मना येईल तें तूं करीं ।
आतां तारीं अथवा मारीं ॥२॥
जनी म्हणे सृष्‍टीवरी ।
एक अससी तूं बा हरी ॥३॥