माझे चित्त तुझें पायीं ।
ठेवीं वेळोवेळां पायीं ॥१॥
मुखीं उच्चार नामाचा ।
कायामनें जीवें वाचा ॥२॥
धरणें तें ऐसें धरुं ।
जनी म्हणे विठ्‌ठल स्मरुं ॥३॥