येणेंमाझें भक्षिलें दहीं दूध लोणी । पळोनियां येथें आला शारंगपाणी वो ॥१॥
आवरीं आवरीं यशोदे आपुला कान्हा । याच्या खोडी किती सांगु जाणा ।
याचें लाघव न कळे चतुरानना । यासी पाहतां मन नुरे मीपणा वो ॥२॥
एके दिवशीं मी आपुलें मंदिरीं । मंथन करितां देखिला पुतनारी ।
जवळी येवोनि रवीदंड धरी । म्हणे मी घुसळितोम तु राहें क्षणभरी वो ॥३॥
परवां आमुचे घरासी आला । संगे घेउनी गोपाळांचा मेळा ।
नाचले ऐकत धरें पाहें अचला । धरूं जातां तो पळोनियां गेला वो ॥४॥
ऐसें बहु लाघव केलें येणें । किती सांगावें तुज गार्हाणें ।
एका जनार्दनीं परब्रह्मा तान्हें । यासी ध्याता खुंटलें येणे जाणे वो ॥५॥