आणिक तेँ तेल घेतलेँ कोणी ।
गो-या कुंभारानीँ चोख्या महारानीँ ।।
तसेच घेतले नरहारी सोनारानीँ ।
कबीरानीँ आणि रोहिदास चांभारानीँ।।
संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल ।
त्याचे तुम्हां मोल देईल पांडुरंग ।।