पवन तो नंदी असे शंकराचा ।
आणीक बळीचा शेतकिचा ।।
नंदीनेँ घेतला सर्वाँचा तो भार ।
कळेना तो पार कोणासही।।
संतु म्हणे नंदी मारील हो तुम्हां ।
दर्शनाशीँ न जातां शंकराच्या।।