मज मागे घाणा सांगे द्वारकेचा राणा ।
मज मागे संसार सांगे रुक्मिणीचा वर।।१।।
मज मागे घेवदेव सांगे रुक्मिणीचा राव ।
मज मागे निद्रा आहार सांगे उमा सारंगधर ।।२।।
किर्तीविणा कांही मागे ते राहिना ।
संतु सांगे खुणा तुकयाशी ।।३।।