अशीच ती ओढ कोठेँ ती ओढली ।
देवा आणि दैत्यांनि मिळोनियां ।।
मंथन ते केलेँ सप्त समुद्राचेँ ।
हाता काय आलेँ काळकुट ।।
संतु म्हणे ओढ फार ओढुं नये ।
तुटेल ती पाहे सहजची ।।