मार्कँड ऋषीँचेँ गळी पडता पाश ।
केला तेणेँ ध्यास शंकराचा ।।
सत्यवाना गळी पडतांच पाश ।
केला त्याचा नाश सावित्रीने ।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती शिळ ।
देतेँ तिळगुळ यमा हाती।।