हरिचंद्रराजाने पाचरी ओळखिल्या ।
हाकलुनि दिल्या घरातुनी ।। १ ।।
अशा ह्या पाचरी ओळखिल्या कोणी ।
गोरोबानी आणि तुकारामजिनी ।।२।।
संतु म्हणे माझ्या घाण्याच्या पाचरी ।
सद्गुरुवांचोनी ओळखिना कोणी ।।३।।