हाटीं जायाचि तांतडी ।
नामा होता पैल थडी ॥१॥
म्हणे जा गे आणा त्यासी ।
नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
जनी धांवत चालली ।
मागें विठ्‌ठल माउली ॥३॥