जनीचिया बोलें करी नित्य काम ।
वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥
जनीचिया गोष्‍टी प्रेम ज्याचे मनीं ।
तयाचे चरणीं ओढवी माथा ॥२॥
महेशादिदेव तेहि तया ध्याती ।
जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥