कौरवांनीं दुष्‍ट भाव ॥१॥
टाकियेला फांसा ।
पांडव गेले वनवासा ॥२॥
वना गेले पांडवबळी ।
दिनकरें दिधली थाळी ॥३॥
पांडवांची कृष्णाबाई ।
जनी म्हणे माझी आई ॥४॥