चिंतनीं चित्ताला ।
लावी मनाच्या मनाला ॥१॥
उन्मनीच्या मुखा आंत ।
पांडुरंग भेटी देत ॥२॥
कवटाळुनी भेटी पोटीं ।
जनी ह्मणे सांगूं गोष्‍टी ॥३॥