कां गे निष्‍ठुर झालीसी ।
मुक्या बाळातें सांडिसी ॥१॥
तुज वांचोनिया माये ।
जीव माझा जावों पाहे ॥२॥
मी वत्स माझी माय ।
नये आतां करुं काय ॥३॥
प्राण धरियेला कंठीं ।
जनी ह्मणे देंई भेटी ॥४॥