अहो देवा हरिहर ।
उतरीं आह्यां भवपार ॥१॥
देवा आह्मी तुझे दास ।
करुं वैकुंठीं वो वास ॥२॥
जनी म्हणे कल्पवृक्ष ।
देव दृष्‍टासी पैं भक्ष ॥३॥