येगे माझे विठाबाई ।
कृपादृष्‍टीनें तूं पाहीं ॥१॥
तुजविण न सुचे कांहीं ।
आतां मी वो करुं कांहीं ॥२॥
माझा भाव तुजवरी ।
आतां रक्षीं नानापरी ॥३॥
येई सखये धांउनी ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥