देव देखिला देखिला ।
नामें ओळखुनी ठेविला ॥१॥
तो हा विटेवरी देव ।
सर्व सुखाचा केशव ॥२॥
जनी ह्मणे पूर्ण काम ।
विठ्‌ठल देवाचा विश्राम ॥३॥