चोखामेळा अनामिक ।
भक्‍तराज तोचि एक ॥१॥
परब्रह्म त्याचे घरीं ।
न सांगतां काम करी ॥२॥
रोहिदास तो चांभार ।
पाहे मोमिन कबीर ॥३॥
नेमी जबी बीच दासी ।
रंगीं वेढी नांगर पिशी ॥४॥