माझा शिणभाग गेला ।
तुज पाहतां विठ्‌ठला ॥१॥
पाप ताप जाती ।
तुझें नाम ज्याचे चित्तीं ॥२॥
अखंडित नामस्मरण ।
बाधूं न शके तया विघ्‍न ॥३॥
जनी ह्मणे हरिहर ।
भजतां वैकुंठीं त्या घर ॥४॥