जन्मा येऊनियां देख ।
करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्‌ठलाचें ।
तेणें सार्थक देहाचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा ।
शेषा वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम तारक त्रिभुवनीं ।
ह्मणे नामयाची जनी ॥४॥