बाळे भोळे ठकविशी ।
तें तंव न चले आह्मांपाशीं ॥१॥
गर्व धरिसी नामाचा ।
सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥
आशा तृष्‍णा तुह्मांपाशीं ।
नाहीं ह्मणे जनी दासी ॥३॥