अहो गोकुळींच्या देवा ।
आदि अंत तुम्हां ठावा ॥१॥
न लगे पुसावें हो कोणा ।
आदि अंत हो सुजाणा ॥२॥
जनी म्हणे हो गोकुळीं ।
किती खासी उष्‍टावळी ॥३॥