मी तों समर्थाची दासी ।
मिठी घालीन पायांसीं ॥१॥
हाचि माझा दृढभाव ।
करीन नामाचा उत्सव ॥२॥
आह्मां दासीस हें काम ।
मुखीं विठ्‌ठल हरिनाम ॥३॥
सर्व सुख पायीं लोळे ।
जनीसंगें विठ्‌ठल बोले ॥४॥