पक्षी जाय दिगंतरां ।
बाळकांसी आणी चारा ॥१॥
घार हिंडते आकाशीं ।
झांप घाली पिल्लापासीं ॥२॥
माता गुंतली कामासी ।
चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥
वामर हिंडे झाडावरी ।
पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥
तैंसी आह्यासी विठ्‌ठल माये ।
जनी वेळोवेळां पाहे ॥५॥