फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा ॥१॥
वारियाने कुंडलें हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥
राधा पाहून भुललें हरी । बैल दुभें नंदाघरी ॥३।।
हरी पाहूनि भुलली चित्ता । राहा घुसळी पडेरा रिता ॥४॥
मन मिनलेंसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥