दहींभात कालवोनि दिला वेगीं झडकरीं । कडेवरी घेऊनियां फिरलें मी द्वारोद्वारीं ।१॥

राधे राधे राधे राधे घेई शामसुंदरा । नेई आतां झडकरीं आपुलिया मंदिरा ॥धृ॥

क्षणभरी घरीं असतां करी खोडी शारंगपाणी । खेळावया बाहेरीं जातां आळ घेती गौळणी ।

थापटोनि निजवितां पळोनि जातो राजद्वारा ॥२॥

राधा घेउनि हरिला त्वरें जात मंदिरीं । हृदयमंचकीं पहुडाविला श्रीहरीं ।

एका जनार्दनीं हरीला भोगी राधा सुंदरीं ॥३।।