स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या ॥१॥
साव्धान हो पाहे बा पंढरी । धरीं तु अंतईं संतसंग ॥२॥
नको पंडुं फेरी चौर्यायंशीं आवृत्ती । गाय तुं किर्ती वैष्णवांची ॥३॥
तरले बहुत तरती भरंवसा । विश्वास हा बापा धरी ऐसा ॥४॥
सुगम सोपा चुकती जेणें खेपा । एका जनार्दनीं जपा विठ्ठल नाम ॥५॥