जयाचेनि तुटे भवबंधन । तयासी जाण विसरती ॥१॥
करिती आणिकांची सेवा । ऐसे ते अभागी निर्दैवा ॥२॥
मुळींच नाहीं देवपण । तेथें करिती जप ध्यान ॥३॥
विसरूनि खर्या देवासी । भुलले आपुल्या मानसीं ॥४॥
सत्य सत्य बुडती जनीं । एका शरण जनार्दनीं ॥५॥