आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |

सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||

राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |

तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||

तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |

म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||


श्री तुकारामांची आरती २

प्रपंञ्चरचना सर्वहि भोगूनि त्यागिली ।

अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धि हरविली ।। वैराग्याची निष्ठा प्रगटुनि दाखविली ।

अहंममता दवड्डुनि निजशान्ती वरिली ।। १ ।।जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ।। धृ ।।

हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्त ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ।।

जगदुद्धारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनाचा संदेह निरसीला ॥ धृ ॥ २ ॥

तेरा दिवस वह्या रक्षुनियां उदकीं । कोरड्याचि काढुनि दाखविल्या शेखी ।।

अपार कविताशक्ति मिणवुनि इहलोकीं । कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरति जन लोकीं ॥ धृ ॥ ३ ॥