विठ्ठल पै सार हा जपु आमुचा – संत सोपानदेव अभंग

विठ्ठल पै सार हा जपु आमुचा ।
आणि त्या शिवाचा नित्यनेमु ।।१।।
गोविंद श्रीहरि हेचि तो उच्चारी ।
शिव वराचरी आत्माराम ।।२।।
नामेविण नेणे दुनियाची मातु ।
गोविंद स्मरतु शिवराणा ॥३॥
सोपान धारणा गोविंद पाठाची ।
कोटि पै कुळाची कुळवडी ।।४।।