उघडली दृष्टी इंद्रिया सकट – संत सोपानदेव अभंग
उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।
वैकुंठीची वाटपंढरी जाणा ॥१॥
दृष्टीभरी पाहे दैवत ।
पूर्ण मनोरथ विठठलदेवे ।।२।।
हाची मार्ग सोपा जनासी उघड |
विषयाचे जाड टाकी परते ॥३॥
सोपान म्हणे गुफसी सर्वथा।
मग नव्हे उत्तथा भक्तिपंथे ॥४॥