संसारी आलीया – संत सोपानदेव अभंग
संसारी आलीया । कारे नोळखशी ।
नरहरी न म्हणशी । ऐक्याभावें ॥१॥
जपनाम विद्या । जपनाम विद्या ।
संसारी अविद्या । जन्मवृथा ॥२॥
वर्मबीज सांगावे । कवणें हे सांगावे ।
सोपानदेवें पैं । जोडियेलें धन ।
नित्य हे स्मरण । रामनाम ॥४॥