सागरीचे सोय जगा निवारीत – संत सोपानदेव अभंग

सागरीचे सोय जगा निवारीत ।
मागुते भरीत पूर्णपणे ।। १॥
तैसे आम्ही दास तुज माजी उदास ।
तू आमुचा निवास सर्व देवा ॥२॥
तुजमाजी विरो सुखदुः विसरो ।
तुझ्यानामे तरो येची जन्मी ।।३।।
सोपान निकट बोलोनी सरल ।
तुष्टला गोपाळ अभय देत ॥४॥