पाहाणे परिसणे नामरूपी गेले – संत सोपानदेव अभंग
पाहाणे परिसणे नामरूपी गेले ।
निराकारी ठेले एकतत्वेसी ॥१॥
एकतत्वेसी हरि एक रूप माझा ।
भिन्न भाव दुजा नाही नाही ।।२।।
संग परिकर सापडला आम्हा ।
सर्व आत्माराम पूर्णपणे ॥३॥
सोपान देव्हडे मन माजिवडे ।
ब्रह्मांड येवढे गिनियेले ॥४॥