नामामृत राशी – संत सोपानदेव अभंग

नामामृत राशी । सेविका सुखेंसी ।
पुढती तूं न येसी । गर्भवासा ॥१॥
रामकृष्ण गोविंद । हरिकृष्ण गोविंद ।
नित्य तो पैं छंद । ऐसा घेई ॥२॥
स्मरता नामावळी । पावशील गोपाळी ।
वैष्णवाचे मेळीं । अरे जना ॥३॥
सोपान राजसु । केशव विश्वासु ।
नामाचा सौरसु । मुखी धरा ॥४॥