नाद ब्रह्म मुसे नादरुप वसे – संत सोपानदेव अभंग
नाद ब्रह्म मुसे नादरुप वसे ।
तैसा जनी दिसे आत्मपणे ।।१।।
बाहेर साबडा आम्हा दिसे घड़ा ।
मातियेचा वेढा जीवनालागी ।।२।।
तैसे हे शरीर आत्मपणे नीट ।
मन हे निकट बोखाळपणे ।।३।।
सोपान साजिरे ब्रह्म ते गोजिरे ।
जीवन साकार ब्रह्म हेतु ॥४॥