मोकषालागी धन वेचावे नलगे – संत सोपानदेव अभंग

मोकषालागी धन वेचावे नलगे ।
रामकृष्ण वोळगे जपीतुसे ।। १।।
रामकृष्ण मुखे तया अनंत सुखे ।
तो जाय विशेषे बैकुठभुवनी ॥२॥
वेगाचेनि वेगे जपा लागवेगे ।
प्रपंथ वाजगे हरिनामे ॥३॥
सोपान संचित रामनामामृत ।
नित्यता सेवित हरिकथा ॥४॥