मी माझी कल्पना पळाली – संत सोपानदेव अभंग
मी माझी कल्पना पळाली वासना ।
जनी जनार्दना सेवितुसे ॥१॥
तू तव संपन्न आमुवे हो थन ।
सांगितली खूण निवृत्तीदेवी ॥२॥
तुजमाजी प्रेम गेले सप्रेमे ।
जप व्रत नेम हारपले ॥३॥
सोपान सगळा न दिसे इही डोळा ।
तूची बा गोपाळा आत्माराम ॥४॥