माझी अपूर्णता – संत सोपानदेव अभंग

माझी अपूर्णता । गुरुनामी संपन्न ।
निवृत्ती निधान । पूर्णकरी ॥१॥
अमृताचा पाट । वाहे इंद्रायणी ।
नित्यता पर्वणी । हरीच्या दासा ॥२॥
ज्ञानदेवनिधी । पूर्ण माझे मन ।
मुक्ताईने खूण । सांगितली ॥३॥
सोपान बागडा सेवे सवंगडा ।
नित्य तो पवाडा । विठोबाचा ॥४॥