मनाचे मवाळ हरिरुप चितिती – संत सोपानदेव अभंग

मनाचे मवाळ हरिरुप चितिती ।
रामकृष्ण मूर्ति नित्य कथा ।।१।।
रामकृष्ण ध्यान सदा पै सर्वधा ।
न पवेल आपदा नाना योनी ॥२॥
हरि ध्यान जप मुक्त पै अनंत ।
जीव शिवी रत सर्वकाळ ॥३॥
सोपान प्रेमा आनंद हरीचा ।
तुटला मोहाचा मोहपाश ॥४॥