कृष्ण ब्रह्म काळे – संत सोपानदेव अभंग
कृष्ण ब्रह्म काळे । पुराणी गर्जिती ।
व्यासेचि निश्चिती । अर्थ केला ॥१॥
लक्षात न येता । देव ब्रह्म रूप ।
पडिले अमुप । भवचक्री ॥२॥
सत्य रज तम । त्रिगुण विस्तारले ।
महाकारण वहिले । पाहे बापा ॥३॥
सोपानदेव बोले । चैतन्याचि वाणी ।
व्यर्थ धरोनि मौती । हिंडताती ॥४॥